Tuesday, March 11, 2025 06:51:33 AM

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ED चा छापा! 30 लाखांची रोकड जप्त; छापे टाकून परतणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घराची झडती घेणाऱ्या ED अधिकाऱ्यांवर काही लोकांच्या गटाने हल्ला केला. अधिकाऱ्यांचा आरोप आहे की हल्लेखोर काँग्रेस कार्यकर्ते होते.

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ed चा छापा 30 लाखांची रोकड जप्त छापे टाकून परतणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला
Bhupesh Baghel
Edited Image

ED Raids Bhupesh Baghel Residence: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकला. दरम्यान, छापा टाकून परतणाऱ्या ईडी टीमवर हल्ला झाल्याची बातमी समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घराची झडती घेणाऱ्या ED अधिकाऱ्यांवर काही लोकांच्या गटाने हल्ला केला. अधिकाऱ्यांचा आरोप आहे की हल्लेखोर काँग्रेस कार्यकर्ते होते, जे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या परिसरात झडती घेतल्याने संतप्त झाले होते. यावेळी उपसंचालक दर्जाच्या ईडी अधिकाऱ्याच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला.

भूपेश बघेल यांच्या मुलाची चौकशी होणार - 

भूपेश बघेल यांच्या मुलाला ईडीने मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. भूपेश बघेल यांच्या घरातून ईडीचे अधिकारी बाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यादरम्यान ईडीच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने छत्तीसगडमधील 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. 

हेही वाचा - लग्नाच्या रिसेप्शनला येताना 'या' 2 भेटवस्तू आणू नका! तेजस्वी सूर्याचे पाहुण्यांना आवाहन; कोणत्या आहेत या वस्तू? जाणून घ्या

भूपेश बघेल यांच्या घरातून 30 लाख रुपये जप्त -  

छाप्यादरम्यान, ईडीने भूपेश बघेल यांच्या घरातून 30 लाख रुपये रोख, एक पेन ड्राइव्ह आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत, ज्याची चौकशी सुरू आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात दारू घोटाळ्याशी संबंधित 14 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. ईडीच्या मते, दारू घोटाळ्यात सुमारे 2161 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. हे पैसे विविध योजनांद्वारे बेकायदेशीरपणे काढण्यात आले होते आणि चैतन्य बघेल हे पैसे मिळवणाऱ्यांपैकी एक होते.

हेही वाचा - चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये चहलसोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण? जाणून घ्या आरजे महवश बद्दल!

इतर ठिकाणी ED चे छापे - 

ED ने आज दुर्ग लोकसभेचे काँग्रेस उमेदवार राजेंद्र साहू, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष मुकेश चंद्रकर, सहेली ज्वेलर्सचे संचालक सुनील जैन, हॉटेल कॅम्बियनचे संचालक कमल अग्रवाल, वाहतूक व्यावसायिक संदीप सिंग, अभिषेक ठाकूर, बिल्डर अजय चौहान, बिल्डर मनोज राजपूत, बिल्डर पप्पू बन्सल, राईस मिलर विनोद अग्रवाल, सुनील अग्रवाल आणि इतरांच्या घरांवरही छापे टाकले. 


सम्बन्धित सामग्री