Monday, May 12, 2025 09:48:34 PM

हिंदू-मुस्लिम बाळांची रुग्णालयात अदलाबदल; भोंगळ कारभारामुळे कळेना साधनाचं बाळ कुठलं अन् शबाना कुणाची आई

बाळाची अदलाबदली झाल्याची शक्यता लक्षात येताच या मातांना आणि त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. आता कोणतं बाळ कोणत्या कुटुंबाचं हे ठरवण्यासाठी एक टेस्ट केली जाणार आहे.

हिंदू-मुस्लिम बाळांची रुग्णालयात अदलाबदल भोंगळ कारभारामुळे कळेना साधनाचं बाळ कुठलं अन् शबाना कुणाची आई

दुर्ग : ग्रामीण भागातील रहिवासी आणि शहरातील सर्वसामान्य लोक सरकारी रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. यांच्यातील महिलांना प्रसूतीसाठी तर हमखास या रुग्णालयांतच आणले जाते. मात्र, अशा सर्वसाधारण लोकांना रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ व्यवस्थापनाचा फटका अनेकदा बसतो.

अशाच एका प्रकारात एकाच दिवशी काही मिनिटांच्या अंतराने जन्मलेल्या हिंदू आणि मुस्लिम मातांची नवजात बाळांची अदलाबदल झाली आहे.यामुळे या मातांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विनाकारण मनःस्ताप भओगावा लागत आहे.

जिल्हा रुग्णालयामध्ये हिंदू-मुस्लिम अशा दोन बाळांची अदलाबदली झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशी घटना घडल्याची शक्यता लक्षात आल्यामुळे दोन्ही बाळांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.
 

कसा लक्षात आला हा प्रकार

दुर्गच्या जिल्हा रुग्णालयात 23 जानेवारीला शबाना आणि साधना यांची सिझर डिलीव्हरी झाली. शबानाला रात्री 1.25 मिनिटांनी तर साधनाने रात्री 1.34 मिनिटांनी बाळांना जन्म दिला. दोघींनाही काही दिवसांनी घरी पाठवण्यात आले. डिस्चार्जच्या 8 दिवसानंतर म्हणजेच 2 फेब्रुवारीला शबानाच्या कुटुंबीयांची नजर बाळाच्या हातावर असलेल्या टॅगकडे गेली. ज्यावर साधना सिंग हे नाव लिहिलं गेलं होतं, हे पाहून शबाना आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला.

रुग्णालयाच्या नियमानुसार बाळाची ओळख पटावी म्हणून त्याच्या हातावर टॅग लावला जातो. त्यामुळे टॅगवरील नाव वाचून बाळ अदलाबदली तर झालं नाही ना? अशी शंका शबानाच्या कुटुंबाला आली, त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. 

हेही वाचा - Control Negative Thoughts : मनात वारंवार नकारात्मक विचार येतायत? मग 'या' सवयी त्वरित बदला

यानंतर हॉस्पिटलमध्ये जन्मावेळी काढलेले फोटो बघितले गेले, तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली. या फोटोत  साधना सिंगच्या बाळाच्या तोंडावर काळी खूण असल्याचं दिसलं. तर शबानाजवळ जो मुलगा आहे त्याचा रंग जास्त गोरा दिसत होता. फोटो पाहिल्यावर शबाना जवळ जे बाळ आहे ते साधनाचं आणि साधनाजवळ जे बाळ आहे ते शबानाचं असल्याचं दिसून आलं.
कित्येक रुग्णालयं अशी आहेत जिथं एका वेळी अनेक डिलीव्हरी होतात. छत्तीसगडच्या जिल्हा रुग्णालयात डिलीव्हरीसाठी अशाच दोन महिला आल्या, ज्यातील एक हिंदू आणि एक मुस्लिम कुटुंबातील होती. एकीचं नाव साधना सिंग आणि दुसरी शबाना कुरेशी.
 

पुढे काय घडलं?

शबानाच्या कुटुंबाने जेव्हा हॉस्पिटल प्रशासनाकडे स्वत:चं बाळ परत मागितलं तेव्हा डॉक्टरांनी साधना सिंग आणि त्यांच्या पतीला बोलावण्यात आलं. या दोघांनाही बाळ अदलाबदली झाल्याचं सांगितलं गेलं. पण साधना सिंग यांनी हे मानायला नकार दिला. हे सर्व खोटं असून हे एक कारस्थान आहे. 'माझ्याकडे जे बाळ आहे ते माझंच आहे, ते मी कुणालाही देणार नाही,' असं साधना सिंग यांनी सांगितलं. यामुळे शबाना यांच्या कुटुंबीयांनी बाळ बदली झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.

हेही वाचा - Bike Care Tips : बाईकमधील हा भाग असतो सर्वात नाजूक, छोटीशी चूकही घेऊ शकते जीव!
 

डीएनए टेस्ट होणार
रुग्णालय प्रशासनाच्या बेफिकीरी आणि गलथान कारभारामुळे आता 12 दिवसानंतर दोन्ही बाळांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. डीएनए टेस्टमुळे दोन्ही बाळांचे खरे आई-बाप कोण आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री