Saturday, March 29, 2025 02:55:32 PM

पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव झाला. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल अशी लढत दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली.

पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव झाला. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल अशी लढत दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. यात भाजपाचे प्रवेश वर्मा यांचा विजय झाला तर आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. या पराभवानंतर आपला मोठा धक्का बसला असून अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. 

हेही वाचा: भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष

काय म्हणाले अरविंद केजरीवाल? 

अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये केजरीवाल म्हणाले, 'आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जनतेचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्ण विनम्रतेने स्विकारत आहोत. मी भारतीय जनता पार्टीचे विजयाबद्दल अभिनंदन करु इच्छितो. दिल्लीच्या जनतेने ज्या आशा आणि अपेक्षा ठेवून त्यांना बहुमत दिले आहे, त्या ते पूर्ण करतील अशी मला आशा आहे.'

'मागील दहा वर्षात जनतेने आम्हाला संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही अनेक विकास कामे केली. खास करुन शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. लोकांना दिलासा देण्याचा आम्ही अनेक मार्गांनी प्रयत्न केला. दिल्लीतील पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला', असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले.

हेही वाचा:  एकनाथ शिंदेंकडून भाजपाचं अभिनंदन

'आता जनतेने जो कौल दिला आहे, त्यानुसार आम्ही सकारात्मकपणे विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करु. याशिवाय आम्ही समाज सेवा, दिल्लीच्या जनतेच्या सुख-दु:खात मदत करत राहू. शक्य तितके वैयक्तिक सहकार्य करु. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही राजकारणात प्रवेश केला नाही. लोकांची सेवा करण्याचे राजकारण हे एक माध्यम आहे' असे केजरीवाल म्हणाले.

व्हिडीओच्या शेवटी अरविंद केजरीवाल यांनी 'मी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी हुशारीने निवडणूक लढवली. खूप मेहनत केली. या निवडणुकीत तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला' असे म्हणत पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत पराभवनानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.  

 


सम्बन्धित सामग्री