Tuesday, April 08, 2025 01:20:48 PM

Delhi Election Results 2025: दिल्लीतील विजयानंतर मुंबईत भाजपाचं जोरदार सेलिब्रेशन

दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे.

delhi election results 2025 दिल्लीतील विजयानंतर मुंबईत भाजपाचं जोरदार सेलिब्रेशन

दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपा विजयी झाले. भाजपाने आम आदमी पार्टीला पारभूत केले आहे. दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे. 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४८ जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसला मोठा भोपळा मिळाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. एवढ्या मोठ्या प्रतिक्षेनंतर भाजपाला दिल्लीत विजय मिळाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. 
भाजपाच्या विजयानंतर देशभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांचा डान्स पाहायला मिळत आहे. दिल्ली विधानसभा विजयानंतर भाजपाचा जल्लोष सुरू झाला आहे.मुंबईतील वाशीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला केला. दिल्ली विधासभेत भाजपला बहुमत मिळाल्याने फटाके फोडत पेढे भरवत जल्लोष साजरा केला आहे. 

दीर्घ प्रतिक्षेनंतर दिल्लीत भाजपाची सत्ता आल्याने मुंबईत जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळाले. तसेच ठाण्यात भाजपाने जल्लोष केला आहे. भाजप कार्यालयासमोर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. दिल्लीत भाजपचं कमळ फुलणार आहे. त्यामुळे भाजपाचे नेते, कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होताच ठाण्यात जल्लोष पाहायला मिळाला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजपा कार्यालयासमोर जल्लोष सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांचे फोटो घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. 


हेही वाचा : Delhi Election Results 2025: दिल्लीत भाजपाची मुसंडी
 

दिल्लीत मोदींच्या हजेरीत भाजपचं सेलिब्रेशन
दिल्लीत मोदींच्या हजेरीत रात्री भाजपचं सेलिब्रेशन होणार आहे. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहेत. रात्री 8 पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दिल्लीतील विजयाचं भाजपाकडून जोरदार सेलिब्रेशन होत आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष केला जात आहे. 


सम्बन्धित सामग्री