Delhi Secretariat Sealed: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला असून भाजपने इतिहास रचला आहे. दिल्लीत भाजपच्या प्रचंड विजयानंतर आता आपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सुरक्षा परिस्थिती आणि सरकारी नोंदी लक्षात घेता दिल्ली सचिवालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे. दिल्ली सचिवालयातून कोणत्याही फायली, कागदपत्रे किंवा संगणक हार्डवेअर घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'जनशक्ती सर्वोच्च आहे!' विकास जिंकला, सुशासन जिंकले! दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात सूचना जारी केली असून त्यात सुरक्षेच्या चिंता आणि नोंदींच्या सुरक्षिततेसाठी, जीएडीच्या परवानगीशिवाय दिल्ली सचिवालय परिसराबाहेर कोणत्याही फायली/कागदपत्रे, संगणक हार्डवेअर इत्यादी नेऊ नयेत असं आवाहन करण्यात आलं आहे. या आदेशाचे सचिवालयातील सर्व विभाग, कार्यालये आणि शाखांना पालन करावे लागणार आहे. यासोबतच, हा आदेश मंत्री परिषदेच्या सचिवालय कार्यालये आणि कॅम्प ऑफिसना देखील लागू असेल. या आदेशावर सहसचिव (जीएडी) प्रदीप तायल यांची स्वाक्षरी आहे.
हेही वाचा - Delhi Election Result 2025: मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून 600 मतांनी पराभूत
भाजपचा ऐतिहासिक विजय -
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आदी आपचे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. आता दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. निवडणूक निकाल पाहता, दिल्ली सरकारच्या कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी सचिवालय सील करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.