Friday, January 03, 2025 04:13:25 AM

28 lakh lights will be lit on 55 ghats in Ayodhya
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे उजळणार

श्री रामलल्लाच्या अयोध्येत बुधवारी आठवा दीपोत्सव साजरा होत आहे.

अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे उजळणार

अयोध्या : श्री रामलल्लाच्या अयोध्येत बुधवारी आठवा दीपोत्सव साजरा होत आहे. हा दीपोत्सव यावर्षी अगदी खास असणार आहे, कारण येथील भव्य मंदिरात यंदा प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान आहेत. यंदा ५५ घटांवर तब्बल २८ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार असून, हा एक जागतिक विक्रम ठरेल. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त असून, १० हजार पोलिस तैनात केले आहेत. दीपोत्सवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती असेल.

 

काय आहे अयोध्येतील तयारी ?

यंदा प्रथमच नव्या मंदिरात विराजमान प्रभू श्रीराम दीपोत्सवात सहभागी होणार असल्याने अयोध्येत प्रचंड उत्साह 
श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, श्री हनुमान व वशिष्ठ मुनींच्या वेशभूषेतील कलाकारांवर पुष्पवृष्टी केली जाणार
श्री राम-सीता पूजन झाल्यानंतर तेथे प्रतीकात्मक राज्याभिषेक होणार 
सायंकाळी शरयू तीरावर आरती होणार असून 'राम की पैडी'वर शुभमुहूर्तावर दीप प्रज्ज्वलित केले जातील
या दीपोत्सवानिमित्त लेझर शोचे आयोजन करण्यात आले असून शरयू तीरावर आकर्षक आतषबाजी केली जाणार 


सम्बन्धित सामग्री