पणजी : गोव्यात राजश्री फिफ्टी वीकली लॉटरीच्या ड्रॉमधून पार्थ दत्तात्रेय तळेकर यांनी २१ लाख रुपयांचे बक्षिस जिंकले. पणजी डायरेक्टोरेट ऑफ स्मॉल सेव्हिंग्स अँड लॉटरीजच्या कार्यक्रमात पार्थ तळेकर यांचा सत्कार करुन त्यांना बक्षिसाच्या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
गोवा राज्य लॉटरीच्या सहसंचालिका सविता काकोडकर यांनी पार्थ यांचा सत्कार केला आणि त्यांचे अभिनंदन केले. तर पार्थ यांनी आनंद व्यक्त केला. एवढी मोठी रक्कम जिंकेन असे कधीच वाटले नव्हते. यामुळे सत्कार झाला धनादेश हाती आला तरी अद्याप विश्वास बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी व्यक्त केली. लॉटरीतून मिळालेल्या पैशांचा घरच्यांसाठी विचारपूर्वक विनियोग करणार असल्याचेही पार्थ यांनी सांगितले.
राजश्री लॉटरी ही गोव्यातील एक प्रतिष्ठीत लॉटरी झाली आहे. संपूर्ण लॉटरी प्रक्रियेत पारदर्शकता बाळगली जात असल्यामुळे राजश्री लॉटरीविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता वाढली आहे. राजश्री लॉटरीच्या विजेत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे लॉटरीच्या विश्वासार्हतेत आणखी वाढ होण्यास मदत झाली आहे.
राजश्री लॉटरी प्रत्येकाला स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करुन देऊ इच्छिते. जेव्हा विजेत्यांची स्वप्न पूर्ण होताच तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद हा आमच्यासाठी समाधानी करतो, अशी प्रतिक्रिया सविता काकोडकर यांनी दिली. प्रत्येक लॉटरी विजेता हा इतरांसाठी नवी आशा ठरत आहे. आता सगळ्यांचे लक्ष गुरुवार १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असलेल्या राजश्री ट्वेंटी मंथली लॉटरीच्या ड्रॉ कडे आहे. या ड्रॉ साठी लॉटरीच्या तिकिटांची विक्री सुरू आहे. कोणाचा भाग्योदय होणार हे लवकरच कळेल. अनेकजण जिंकण्याच्या आशेने लॉटरी खरेदी करत आहेत.