Wednesday, October 02, 2024 12:50:43 PM

'आप'च्या संजय सिंह यांना जामीन

आपच्या संजय सिंह यांना जामीन

नवी दिल्ली, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. यामुळे संजय सिंह आता तुरुंगातून बाहेर येणार आहेत. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात झाली आहे.

दिल्ली दारू घोटाळ्याच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय सिंह यांच्यावर आहे. संजय सिंह मागील सहा महिन्यांपासून तुरुंगात होते. ईडीने त्यांची चौकशी करून पुरावे संकलित करण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे ईडीने संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर हरकत घेतली नाही. हरकत नसणे आणि सहा महिन्यांपासून तुरुंगात असणे या दोन बाबींचा विचार करून न्यायालयाने संजय सिंह जामीन दिला. संजय सिंह तुरुंगातून बाहेर आले तरी त्यांच्या विरोधत आर्थिक गैरव्यवहाराचा खटला सुरू राहणार आहे.

सुप्रिया सुळेंनी केले अभिनंदन

राशपच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून संजय सिंह यांचे जामीन मिळाल्याबद्दल जाहीर अभिनंदन केले.

https://twitter.com/supriya_sule/status/1775117747346956637

        

सम्बन्धित सामग्री