Tuesday, July 02, 2024 08:46:01 AM

केजरीवाल, मुक्काम पोस्ट तिहार कोठडी

केजरीवाल मुक्काम पोस्ट तिहार कोठडी

नवी दिल्ली, १ एप्रिल २०२४, प्रकरणी : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी केजरीवालांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानंतर केजरीवालांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात झाली आहे. तिहारच्या कोठडी क्रमांक दोनमध्ये केजरीवालांचा मुक्काम असेल. कोठडीत एकटेच असणार अरविंद केजरवाल. आता केजरीवालांचा नवा पत्ता मुक्काम पोस्ट तिहार कोठडी असा असेल.

तिहारमध्ये असलेले पहिले विद्यमान मुख्यमंत्री

तिहारच्या तुरुंगात रवानगी झालेले पहिले विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपचे खासदार संजय सिंह, केजरीवाल सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन हे सर्वजण तिहारच्या तुरुंगात आहेत.


सम्बन्धित सामग्री