Tuesday, July 02, 2024 08:16:16 AM

केजरीवाल प्रकरणात जर्मनी पाठोपाठ अमेरिकेने नाक खुपसले

केजरीवाल प्रकरणात जर्मनी पाठोपाठ अमेरिकेने नाक खुपसले

नवी दिल्ली, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : केजरीवाल प्रकरणात जर्मनी पाठोपाठ अमेरिकेने नाक खुपसले. अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. या प्रकरणात सुरू असलेल्या कारवाईवर लक्ष ठेवून आहोत. निःपक्षपाती कारवाई होईल अशी आशा बाळगतो, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया दोन्ही देशांकडून आली. भारताने जर्मनी आणि अमेरिकेच्या या उद्दामपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जर्मनीची प्रतिक्रिया येताच भारताने जर्मनीचे दिल्लीतील उप राजदूत जॉर्ज एनझवीलर यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने जर्मनीचे दिल्लीतील उप राजदूत जॉर्ज एनझवीलर यांची कानउघाडणी केली. आता अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेची प्रतिक्रिया भारताने अमेरिकेच्या दिल्लीतील दुतावासाच्या अधिकाऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने अमेरिकेच्या दिल्लीतील दुतावासाच्या अधिकाऱ्याची कानउघाडणी केली.

केजरीवाल प्रकरणात जर्मनी पाठोपाठ अमेरिकेने नाक खुपसले

भारताने व्यक्त केली नाराजी

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावर भारताचा तीव्र आक्षेप

जर्मनीच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याच्या वक्तव्याचा भारताने निषेध केला

              

सम्बन्धित सामग्री