Tuesday, July 02, 2024 08:37:05 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक

दिल्ली, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांचा सुमारे दोन तास जाबजबाब नोंदविल्यानंतर त्यांना अटक करुन ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले. केजरीवाल यांनी बीआरएसच्या नेत्या के. कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे. केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी त्यांच्या विधी सल्लागारांनी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज दाखल केला.

'आप'चे कार्यकर्ते आक्रमक

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर, पुण्यात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न. पोलीस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट. या आंदोलनाला परवानगी नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतेय. दरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


सम्बन्धित सामग्री