Friday, November 22, 2024 11:06:11 AM

निवडणुका २०२९ मध्ये एकत्र; कोविंद समितीचा अहवाल

निवडणुका २०२९ मध्ये एकत्र कोविंद समितीचा अहवाल

नवी दिल्ली, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी :'एक देश, एक निवडणूक' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला. १८,६२६ पानांच्या या अहवालात या कल्पनेला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून, सर्व विधानसभांचा कार्यकाळ सन २०२९पर्यंत वाढवण्यात यावा, अशी शिफारस केली आहे. या मध्यवर्ती कल्पनेस सर्व पक्षांनी सहमती दिल्यास २०२९पासून देशात एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर २०२६पर्यंत महाराष्ट्रासह २५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo