Sunday, April 13, 2025 12:50:28 PM

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; १८ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई १८ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक

नवी दिल्ली, १४ मार्च, २०२४ : माहिती आणि प्रसारण मंत्रायलयाने ऑनलाईन माध्यमांवरील अश्लिल आणि असभ्य मजकूर आणि माहिती यासंदर्भात आज मोठी कारवाई केली आहे. मंत्रायलाने देशभरातील १८ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. यासोबतच देशभरात १९ वेबसाइट, १० ॲप्स, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मचे ५७ सोशल मीडिया हँडल देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विविध ऑनलाईन, डिजीटल माध्यमांवरील मजकूर IT कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्यासह अनेक कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

यापूर्वी, सरकारने नेटफ्लिक्स, डिस्ने आणि इतर स्ट्रीमिंग सेवांना २० जून २०२३ रोजी ऑनलाइन ठेवण्यापूर्वी अश्लील आणि हिंसक सामग्रीचे पुनरावलोकन करण्यास सांगितले होते.


सम्बन्धित सामग्री