नवी दिल्ली, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : महसूल गुप्तचर संचालनालयाने “राइजिंग सन” मेहीमेअंतर्गत परदेशी मूळ सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला. डीआरआयने गेल्या दोन दिवसात गुवाहाटी, बारपेटा, दरभंगा, गोरखपूर आणि अररिया येथे १९ वाहने, रोख आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह ६१ किलो तस्करीचे सोने आणि ४० कोटी रुपये जप्त केले.
गुवाहाटी येथून सिंडिकेटच्या ६ सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सुमारे २२ किलो सोने, १३ लाख रुपये, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.