Thursday, June 27, 2024 08:23:13 PM

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धमकी

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धमकी

बंगळुरू, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटाला चार दिवस झाल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि सर्व कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ई-मेल मिळाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ई-मेलमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्री परमेश्वरा आणि बेंगळुरू पोलिस आयुक्त यांना लक्ष्य केले जाणार असल्याचे म्हटले आहे. आम्हाला २५ लाख डॉलर दिले नाही तर आम्ही कर्नाटकात बस, रेल्वे, मंदिरं, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करू, असे ई-मेलमध्ये म्हटले आहे. शाहिद खान या नावाने आलेल्या मेलमध्ये शनिवारी ९ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये दुपारी २.४८ मिनिटांनी बॉम्बस्फोट होईल असे म्हटले आहे. तसेच अंबारी उत्सवात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री