Tuesday, July 02, 2024 08:14:47 AM

नवी दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचं आंदोलन

नवी दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचं आंदोलन

नवी दिल्ली, ०८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : दिल्लीतील माहामाया भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांनी हमीभावासाठी आंदोलन पुकारले आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीत आंदोलन पुकारले आहे. तसेच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बॅरिकेडिंग करत पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखलं आहे. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत काढलेल्या या मोर्चामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. हमीभावासाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्यावतीने कृषीमंत्री अर्जुन मुंडा, मंत्री नित्यानंद राय, मंत्री पीयूष गोयल शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ही चर्चा गुरुवारी संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

याआधीही शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन पुकारलं होत. पण त्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. दिल्लीच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचे आरोप काय ?

एनटीपीसीचा मोबदला एकसमानता नाही
एनटीपीसीचा वेगवेगळा मोबदला दिला
नोकरी देण्याचं आश्वासन पूर्ण झालं नाही
नोएडा अथॉरिटीने १०% प्लॉट परत घेतले.
अंसल बिल्डरने शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही.


सम्बन्धित सामग्री