Saturday, October 05, 2024 03:13:45 PM

चंपई मुख्यमंत्री, हेमंत सोरेनना ईडी कोठडी

चंपई मुख्यमंत्री हेमंत सोरेनना ईडी कोठडी

रांची, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी अटक करणार याची खात्री झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सध्या हेमंत सोरेन ईडीच्या पाच दिवसांच्या कोठडीत आहेत. याआधी विशेष पीएमएलए न्यायालयाने हेमंत सोरेन यांची एक दिवसाची ईडी कोठडी दिली होती. या कोठडीची मुदत संपण्याआधी विशेष पीएमएलए न्यायालयाने हेमंत सोरेन यांना आणखी पाच दिवसांची ईडी कोठडी दिली. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड केली. राज्यपालांनी शुक्रवारी चंपई यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज्यपालांनी चंपई सोरेन यांना दहा दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश मिळाल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने त्यांचे सर्व आमदार हैदराबादमध्ये एका सुरक्षित ठिकाणी एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 'झामुमो'चे आमदार हैदराबादमध्ये आहेत. चंपई सोरेन यांनी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

झारखंड विधानसभेची सध्याची स्थिती

एकूण सदस्य ८१

झारखंड मुक्ती मोर्चा - २९
काँग्रेस - १६
राष्ट्रवादी काँग्रेस - १
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, लिबरेशन - १
राष्ट्रीय जनता दल - १

भारतीय जनता पार्टी - २५
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन - ३
अपक्ष - ३

रिक्त जागा - १


सम्बन्धित सामग्री