Thursday, September 19, 2024 05:20:48 AM

कररचनेत कोणताही बदल नाही

कररचनेत कोणताही बदल नाही

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभेत लेखानुदान सादर करताना कररचनेत कोणताही बदल केलेला नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले. यामुळे आर्थिक वर्ष २०२३ - २४ प्रमाणेच कररचना राहणार आहे.

वार्षिक उत्पन्न ० ते २.५ लाख रुपये - जुन्या रचनेत ० टक्के कर
वार्षिक उत्पन्न २.५ लाख ते ५ लाख रुपये - जुन्या रचनेत ५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न ५ लाख ते १० लाख रुपये- जुन्या रचनेत २० टक्के कर
वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक रुपये- जुन्या रचनेत ३० टक्के कर

वार्षिक उत्पन्न ० ते ३ लाख रुपये - नव्या रचनेत ० टक्के कर
वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपये - नव्या रचनेत ५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न ६ लाख ते ९ लाख रुपये - नव्या रचनेत १० टक्के कर
वार्षिक उत्पन्न ९ लाख ते १२ लाख रुपये - नव्या रचनेत १५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न १२ लाख ते १५ लाख रुपये - नव्या रचनेत २० टक्के
वार्षिक उत्पन्न १५ लाखांपेक्षा अधिक रुपये - नव्या रचनेत २० टक्के अधिक ३ टक्के (प्रत्येक अतिरिक्त लाख रुपयांमागे)

लेखानुदान लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे यंदा १ फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात आले. निवडणुकीनंतर नवे सरकार उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करेल.


सम्बन्धित सामग्री