Saturday, September 28, 2024 11:43:25 PM

झारखंडचे मुख्यमंत्री राजीनामा देणार ?

झारखंडचे मुख्यमंत्री राजीनामा देणार

रांची, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने समन्स बजावल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोरेन यांना अटक होण्याची शक्यता आहे. संकटाची जाणीव होताच हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. राज्यपालांना भेटून हेमंत सोरेन पदाचा राजीनामा देतील यानंतर थोड्या वेळाने मुख्यमंत्री निवास येथून ईडीचे अधिकारी सोरेन यांना अटक करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. मागील सहा तासांपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी सुरू आहे.

मुख्यमंत्री रात्री राज्यपालांना भेटणार

राज्यपालांकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भेटीसाठी रात्री ९ नंतरची वेळ मिळाली आहे. राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थान आणि रांचीचे ईडी कार्यालय या तीन इमारतींच्या भोवतालच्या १०० मीटरच्या परिसरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

झारखंड विधानसभेची सध्याची स्थिती

एकूण सदस्य ८१

झारखंड मुक्ती मोर्चा - २९
काँग्रेस - १६
राष्ट्रवादी काँग्रेस - १
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, लिबरेशन - १
राष्ट्रीय जनता दल - १

भारतीय जनता पार्टी - २५
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन - ३
अपक्ष - ३

रिक्त जागा - १

  

सम्बन्धित सामग्री