Sunday, June 30, 2024 10:06:43 AM

बिहारात सत्ताबदल, मुख्यमंत्री नितीशच

बिहारात सत्ताबदल मुख्यमंत्री नितीशच

२८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार सत्तेतून बाहेर पडले आहे. सकाळीच नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश करत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यावेळी भाजप समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, रविवारी सकाळपासूनच बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सकाळीच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयू आणि भाजपाचे प्रत्येकी तीन मंत्री, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चातील एक आणि एका अपक्ष आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि चिराग पासवानही राजभवनात उपस्थित होते.

           

सम्बन्धित सामग्री