Sunday, June 30, 2024 09:47:09 AM

नितीश कुमारांचं ठरलं ?

नितीश कुमारांचं ठरलं

२६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपासोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी म्हणजे २८ तारखेला भाजपासोबत पदाची शपथ घेऊ शकतात. नितीश कुमार भाजपासोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपाच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे.

इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतंत्रपणे लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता नितीश कुमार भाजपसोबत गेले तर इंडिया आघाडीची मोठी पिछेहाट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.


सम्बन्धित सामग्री