Tuesday, July 09, 2024 02:28:32 AM

राम मंदिराला दान केले १०१ किलो सोने

राम मंदिराला दान केले १०१ किलो सोने

अयोध्या, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राम मंदिराला एका भक्ताने १०१ किलो सोने दान केले. हे राम मंदिरासाठी मिळालेले आतापर्यंतचे सर्वात मोठे दान आहे. हे दान सूरतमधील हिरे व्यापारी दिलीपकुमार लाखी यांनी केले आहे. दिलीपकुमार लाखी हे सूरतमधील सर्वात मोठ्या हिरे पॉलिश करण्याच्या कारखान्याचे मालक आहेत. त्यांनी दान केलेल्या सोन्यातील काही भागाचा वापर राम मंदिरातील पंधरा दरवाजांना सोन्याचे पाणी देण्यासाठी करण्यात आला आहे. दान केलेल्या सोन्याचा वापर गाभारा, त्रिशूळ, डमरू, मंदिरातील निवडक खांब यांच्या निर्मितीतही करण्यात आला आहे.

रामकथाकार मोरारी बापू यांच्या अनुयायांनी संयुक्तपणे राम मंदिराला १६.३ कोटी रुपयांचे दान दिले आहे. तर गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राम मंदिरासाठी ११ कोटी रुपयांचे दान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने राम मंदिरासाठी ११ कोटी रुपये दान केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ११ कोटी रुपयांचा धनादेश शिवसेनेच्यावतीने राम मंदिराच्या विश्वस्तांना दिला.

        

सम्बन्धित सामग्री