Tuesday, July 09, 2024 01:22:08 AM

नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

चांदीपूर, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची (Akash-NG missile) यशस्वी चाचणी झाली. डीआरडीओने ओडिशातील चांदीपूर येथून शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ही चाचणी घेतली. आकाश हे जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र आहे. कमी उंचीवरून वेगाने उडणाऱ्या मानवविरहीत लक्ष्याचा वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्र किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आली. नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राने लक्ष्य नष्ट केले. यावेळी अनेक बाबींची तपासणी करण्यात आली.

  

सम्बन्धित सामग्री