Tuesday, July 02, 2024 09:18:45 AM

गूगलवर लक्षद्विपची माहिती शोधण्याचा विक्रम

गूगलवर लक्षद्विपची माहिती शोधण्याचा विक्रम

नवी दिल्ली, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : गूगल या सर्च इंजिनवर लक्षद्विपची (beach destination lakshadweep) माहिती शोधण्याच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली आहे. गूगलच्या निर्मितीपासून आतापर्यंत कधीही या सर्च इंजिनवर लक्षद्विप एवढ्या मोठ्या प्रमाणात शोधल गेले नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला लक्षद्विपला भेट दिली आणि तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला. स्नॉर्केलिंग करून पाण्याखालचे जग बघितले. यानंतर लक्षद्विपमधील पर्यटनाचे फोटो अधिकृत समाज माध्यमावर प्रसिद्ध केले. पंतप्रधानांनी प्रसिद्ध केलेले हे फोटो बघितल्यावर पर्यटनासाठी लक्षद्विपची माहिती जाणून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मालदिवला जाणार असलेल्या अनेक पर्यटकांनी आपली नियोजीत सहल रद्द करून लक्षद्विपसाठी विमानाचे आणि हॉटेलचे आरक्षण करायला सुरुवात केली आहे.

मालदीव सरकारच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीप्पणी केली होती. यानंतर तर लक्षद्विपची माहिती शोधणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच मालदिव सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आम्हाला सर्व शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध जपायचे आहेत, अशी भाषा मालदिवच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ट्वीट करून केली आहे. मालदिव सरकारने सावध पवित्रा घेतला तरी गूगलवर लक्षद्विपची माहिती शोधणाऱ्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.

        

सम्बन्धित सामग्री