कोलकाता, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या शेख शाहजहां यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकली आहे. कारवाईचा भाग म्हणून ईडीचे एक पथक उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील शेख शाहजहां यांच्या घरी जात होते. यावेळी ईडीच्या पथकावर २०० पेक्षा जास्त नागरिकांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ईडीच्या पथकातील दोन अधिकारी गंभीर जखमी झाले. तृणमूल समर्थकांनी ईडीच्या वाहनाची तोडफोड केली. अखेर ईडीचे पथक स्वतःचे वाहन सोडून घटनास्थळावरून पर्यायी वाहनाने वेगाने निघून गेले.