Friday, December 27, 2024 01:01:23 AM

राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली

राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली

अयोध्या, ०२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक २२ जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी प्रभू रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'ट्विटर'वर यासंदर्भात माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट केलं आहे की, "अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड निश्चित झाली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत स्थापना केली जाणार आहे." पुढे त्यांनी लिहिलं आहे की, प्रभू श्रीराम-हनुमानाच्या अतूट नात्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. कर्नाटकातील हनुमानाच्या भूमीतून रामललाची ही सेवा आहे यात शंका नाही."


सम्बन्धित सामग्री