Tuesday, July 09, 2024 01:57:50 AM

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट

उत्तर भारत, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळल्याने उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. परिणामी अनेक शहरांवर धुक्याची चादर पसरली असून रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.

हीच बाब लक्षात घेता काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरं सध्या धुक्याच्या विळख्यात आहेत. पुढील तीन दिवस धुके आणि थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. धुके आणि थंडीमुळे काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या असून काही ठिकाणी वेळेत बदल करण्यात आला आहे.

गाझियाबादमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. २८ डिसेंबरपासून शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या संदर्भात मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. मथुरेत शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सध्या शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.


सम्बन्धित सामग्री