Wednesday, July 03, 2024 04:35:31 AM

तमिळनाडूमध्ये पावसाचा कहर!

तमिळनाडूमध्ये पावसाचा कहर

तमिळनाडू, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरसह पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात पारा घसरला आहे. दिल्लीत बुधवारी सकाळी पारा २२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरापासून तामिळनाडूमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाच्या मते, दक्षिण श्रीलंकेच्या किनार्‍याजवळ विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले चक्रीवादळ आता कोमोरिन क्षेत्र आणि शेजारच्या परिसरात पोहोचलं आहे.

     

सम्बन्धित सामग्री