Saturday, June 29, 2024 02:28:48 AM

तामिळनाडूच्या दक्षिण भागात अवकाळीचा कहर

तामिळनाडूच्या दक्षिण भागात अवकाळीचा कहर

तामिळनाडू, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात पावसाने कहर केला आहे. अनेक भागात अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. दरम्यान, भारतीय वायुसेनेने आणि लष्कराने पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली आहे.


दक्षिण तामिळनाडू गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूर संकटाशी नागरीक झुंज देत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने बचाव कार्य सुरू केले आहे.
तामिळनाडूमध्ये पावसाने कहर केला आहे. तिरुनेलवेली आणि थुथुकुडी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला असून हवाई दलाने सुलूर येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तसेच खाद्यान पोहचवण्यासाठी मदत कार्य सुरू केले आहे. हवाई दलाच्या एमआय - १७ व्ही ५ हेलिकॉप्टरने नागरिकांना मदत करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री