Wednesday, July 03, 2024 03:56:02 AM

तामिळनाडूत पावसाचा कहर

तामिळनाडूत पावसाचा कहर

गेली दोन दिवस तामिळनाडू राज्‍यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पाऊस आणि पुरामुळे तिघांचा मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे ८०० प्रवासी तिरुचेंदूर आणि तिरुनेलवेली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना स्थानिक जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.

तमिळनाडूच्या किनारी भागात केप कोमारिनमध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अनेक नद्या आणि तलाव ओसंडून वाहत आहेत. पूरस्थिती पाहता कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तुतीकोरीन आणि तेनकासी येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


सम्बन्धित सामग्री