Saturday, July 06, 2024 11:52:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर

इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगला सुरतची स्थानिक संस्कृती आणि परंपरेसोबत जोडण्यात आलेलं आहे. या टर्मिनलच्या माध्यमातून १२०० आंतरराज्यीय आणि ६०० आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असणार आहे. तसेच, या रचनेमुळे इमारतीची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ५५ लाखांपर्यंत वाढली आहे. सूरतची स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगची रचना करण्यात आली आहे. श्रेणीसुधारित टर्मिनल भवनाच्या दर्शनी भागात सूरत शहरातील 'रांदेर' भागातील जुन्या घरांच्या समृद्ध आणि पारंपारिक लाकडी कामाचं चित्रण केलं आहे, जेणेकरून प्रवाशांना शहराची चव चाखता येईल. सूरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत ग्रीह ४ मॉडेल अंतर्गत बांधण्यात आली आहे. ही दुहेरी इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, ऊर्जा बचतीसाठी छत, कमी उष्णता वाढवणारे डबल ग्लेझिंग युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि सोलार पॉवर प्लांट यांसारख्या सुविधांनी सुसज्ज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरत डायमंड बोर्सचंही उद्घाटन करण्यात आलं. जगातील हिऱ्यांच्या दागिन्यांचं हे सर्वात मोठं केंद्र ठरणार आहे. कच्चे आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांसोबतच दागिन्यांच्या बाजाराचं सुरत जागतिक केंद्र होत आहे. डायमंड बोर्समध्ये आयात-निर्यातीसाठी स्टेट ऑफ द कस्टम क्लिअरेन्स हाऊस, रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, जागतिक बँकिंग आणि सिक्योर वॉल्टची सुविधा देण्यात आलली आहे.


सम्बन्धित सामग्री