Tuesday, July 02, 2024 08:52:13 AM

रोहितचे आभार, पंड्या कर्णधार !

रोहितचे आभार पंड्या कर्णधार

आयपीएल २०२४ साथीचा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार हे आता ठरलं आहे. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (दि. १५ डिसेंबर २०२३) एक पत्रक जाहीर केले. त्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा आगामी कर्णधार कोण असणार, याची माहिती दिली आहे.


मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आपल्या संघात स्थान दिले होते. पण त्यावेळी रोहित शर्मा हा मुंबईचा कर्णधार कायम असेल, असे सर्वांना वाटत होते. पण त्यानंतर मात्र बऱ्याच गोष्टींची चर्चा सुरु होती. ही चर्चा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत होती. पण आज अखेर मुंबई इंडियन्सने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबई इंडियन्सने आज एक पत्रक जाहीर केले. या पत्रकात हार्दिक पंड्या हा मुंबईचा कर्णधार असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ आगामी आयपीएल २०२४ मोसमाकरिता मैदानात उतरेल. माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून पंड्याकडे संघाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत.

ट्विटर अकाऊंटवरून मानले रोहित शर्माचे आभार
दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०१३ साली रोहितने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर तब्बल १० वर्षे कर्णधारपदाच्या कारकीर्दीत ६ वेळा विजेतेपद मिळविले. तुमचा वारसा ब्लू आणि गोल्डमध्ये कोरला जाईल. धन्यवाद. अशा शब्दात मुंबई इंडियन्सने आभार मानले आहेत.


सम्बन्धित सामग्री