Sunday, October 06, 2024 03:06:53 AM

असा दिसतो राम मंदिराचा गाभारा

असा दिसतो राम मंदिराचा गाभारा

अयोध्या, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राम जन्मभूमी येथे राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. नियोजनानुसार २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याआधी पहिल्यांदा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने मंदिराच्या गाभाऱ्याचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंवरून गाभाऱ्याचे काम झाल्याचे दिसते. न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी गाभाऱ्याचे आणि तिथल्या प्रकाश योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या नियोजनानुसार २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी गाभाऱ्यात प्रभू राम विराजमान होणार आहेत. या सोहळ्यासाठी चार हजार संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित असतील. मंदिराशी संबंधित धार्मिक विधी १६ जानेवारी २०२४ पासून सुरू होतील. मुख्य विधी २२ जानेवारी २०२४ रोजी होतील.

https://twitter.com/ChampatRaiVHP/status/1733409947340112244


सम्बन्धित सामग्री