Monday, July 01, 2024 03:03:23 AM

डीपफेकपासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल?

डीपफेकपासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल

मुंबई , २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अलीकडेच अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. हे प्रकरण नेमके काय हे समोर आल्यानंतर समाज माध्यमांवर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अभिनेत्री रश्मिका मंदानासह आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांचे देखील डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. परंतू हा धोका फक्त मोठ्या कलाकारांनाच नाही तर सर्वसामान्य व्यक्तींचे देखील डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात मग अशा वेळी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया :

बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आपण समाज माध्यमांवर सामायिक करत असतो. परंतू यात सर्वसामान्य व्यक्तींचे काही फोटो टेक्नॉलॉजीचा वापर करुन डीपफेक फोटो किंवा व्हिडीओ तयार केला जाऊ शकतो.यातून पॉलिटिक डीपफेक व्हिडीओ तयार केले जातात तसेच पॉर्नोग्राफीमध्ये देखील याचा वापर केला जातो.

डीपफेकपासून आपला बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल ?

१) कोणताही फोटो किंवा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपण फोटोसोबत जी माहिती अपलोड करत असताना त्यात मेटा-डेटा हा एक महत्वाचा भाग असतो. त्यामध्ये लोकेशन आणि इतर माहिती देखील असते. त्यामुळे ही माहिती तुम्हाला हाइड करावी लागेल कारण ही माहिती संकलित केली जाते. त्यामुळे आपला चेहरा हा फोटोमध्ये आयडेंटिफाय होतो. त्यामुळे फोटो अपलोड करताना आपला डोळा किंवा चेहरा थोडा ब्लर करुन फोटो अपलोड करावा.

२) सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना त्यावर आपला वॉटर मार्क असलेला फोटोचं अपलोड करावा, ज्यामुळे डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला तर आपल्या प्रोफाइलवरुन खरा शेअर करण्यात आला होता, हे लक्षात येते.

आपला व्हिडीओ किंवा फोटो डीफफेकलाबळी पडल्यास कशी घ्याल अॅक्शन?

सर्वप्रथम जो फोटो किंवा व्हिडीओ लीक झाला आहे त्याच्या संबंधित पुरावे स्वत:कडे ठेवावे. कारण त्या पुराव्यांच्या आधारेच तो व्हिडीओ किंवा फोटो लीक करण्याऱ्यापर्यंत पोहोचता येणार आहे. तुम्ही जर भारतात राहात असाल तर सायबर सेलच्या cyber crime gov.in या साइटवर तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही जवळच्या पोलीस स्टेनशमध्ये जाऊन तक्रार करु शकता. तसेच ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुमचा डीपफेक फोटो किंवा व्हिडीओ लीक झाला असेल (उदा. इन्स्टाग्राम किंवा युट्यूब) तिथे देखील तुम्ही तक्रार करु शकता. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमची तक्रार व्हेरिफाय करून . त्या प्लॅटफॉर्मच्या कम्युनिटी गाइडलाइन्सनुसार, ज्या अकाऊंटवरुन तुमचा व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल केला गेलाय त्याला बॅन केलं जातं, डिलिट केलं जातं किंवा त्या प्लॅटफॉर्मच्या कम्युनिटी गाइडलाइन्सनुसार त्याच्यावर अॅक्शन्स घेतली जाते.


सम्बन्धित सामग्री