Friday, November 22, 2024 05:06:38 AM

भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा

भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा

चेन्नई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. सर्व ४० प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून तशी माहिती ससून रुग्णालयाचा देण्यात आली होती. पण, सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

भारत गौरव ट्रेन मधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरने प्राथमिक उपचार केल्यानंतर सगळ्या ४० प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की, चेन्नईहून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रेत अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली होती. ही बाब पुणे रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आली होती. मध्यरात्री ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तातडीने ससून रुग्णालयातील स्टाफ आणि डॉक्टर रेल्वे स्टेशनवर उपचारासाठी दाखल झाले. ४० प्रवाशांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर प्रवाशांची प्रकृती स्थिर झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व ४० प्रवाशांची प्रकृती आता स्थिर आहे. पण, अन्नातून ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे जात आहे. या बाबत अधिक तपास आता रेल्वे प्रशासन करत आहे.


सम्बन्धित सामग्री


jaimaharashtranews-logo