Tuesday, July 02, 2024 08:52:13 AM

कर्णधार रोहित प्लेइंग-११ मध्ये करणार बदल

कर्णधार रोहित प्लेइंग-११ मध्ये करणार बदल

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसत आहे. टीम इंडिया तब्बल १२ वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळणार आहे.

अशा स्थितीत रोहित शर्माला या सामन्यात एकही चूक करायची नाही. वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी टीम इंडियाचे प्लेइंग ११ हे रोहित शर्मासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. रोहित अंतिम सामना जिंकण्यासाठी प्लेइंग ११ काही बदल करू शकतो. यामुळे अंतिम सामन्यामधून एका खेळाडूला वगळले जाऊ शकते.

खरंतर, टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. त्या सामन्यात रोहित शर्माने आर अश्विनचा प्लेइंग १११ मध्ये समावेश केला होता. मात्र, त्या सामन्यानंतर रोहित शर्माने अश्विनला एकही सामना खेळवला नाही. पण आर अश्‍विनचा ऑस्‍ट्रेलियाविरुद्धचा विक्रम खूपच उत्‍कृष्‍ट राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसारखे खतरनाक फलंदाज अश्विनसमोर खूपच कमजोर दिसतात. अश्विनने अनेक वेळा या दोन्ही फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. याशिवाय अहमदाबादची खेळपट्टी फिरकीसाठी योग्य असेल, तर रोहित शर्मा अतिरिक्त फिरकीपटूसोबत खेळू शकतो. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे अश्विनचा संघात समावेश झाल्यास, टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मधून कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल.

या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. फलंदाज असो वा गोलंदाज, भारतीय संघ प्रत्येक विभागात अप्रतिम कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत जर रोहित शर्माने अश्विनला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी दिली तर सूर्यकुमार यादवला प्लेइंग ११ मधून वगळणेवागले जाऊ शकते.


सम्बन्धित सामग्री