Tuesday, July 02, 2024 08:34:53 AM

दिल्ली - दहा नोव्हेंबरपर्यंत प्राथमिक शाळा बंद

दिल्ली - दहा नोव्हेंबरपर्यंत प्राथमिक शाळा बंद

दिल्ली,५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाने गंभीर रूप धारण केले आहे. दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे परिस्थितीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढते प्रदूषण पाहता केजरीवाल सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तर इयत्ता ६ वि आणि १२ पर्यंतच्या शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवल्या जाणार आहे.

दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिश यांनी रविवारी ट्विट करत या बाबत माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शहरातील प्रदूषण पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. तर इयत्ता ६ ते १२ च्या वर्ग हे ऑनलाइन घेतले जातील.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदूषित वातावरण आणि दूषित वारे यांच्यामुळे रविवारी सलग सहाव्या दिवशी दिल्लीत वातावरण सर्वाधिक प्रदूषित होते. दिल्लीचा हवा प्रदूषणाचा निर्देशांक एक्यूआय हा 'अत्यंत गंभीर' श्रेणीत पोहोचला आहे. दिल्लीत, शनिवारी दुपारी ४ वाजता एक्यूआय हा ४१५ नोंदवला गेला. तर रविवारी सकाळी ७ वाजता ४६० पर्यंत घसरले.

दिल्लीत एक्यूआय हा ४५० ओलांडल्यास, केंद्राची वायु प्रदूषण नियंत्रण योजना लागू करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रदूषण करणाऱ्या ट्रक, चारचाकी व्यावसायिक आणि वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी देखील घातली जाऊ शकते.दिल्लीत PM २.५ ची आद्रता ही जागतिक आरोग्य संघटनेने डब्लूएचओ निर्धारित केलेल्या पाच मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर मर्यादेच्या ८० ते १०० पट इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यापासून, तापमानात हळूहळू घट होत आहे. यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये देखील प्रदूषण वाढले आहे.


सम्बन्धित सामग्री