Sunday, September 29, 2024 02:59:42 AM

अवकाशातही रंगणार दीपोत्सव

अवकाशातही रंगणार दीपोत्सव

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दीपोत्सवाला अवघे दोन आठवडे राहिले आहेत. सर्वत्र बाजारपेठा या रंग, रांगोळी, कंदील, दिवे आणि सजावटीच्या सामानाने भरले आहेत. दरम्यान, वातावरणात दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नोव्हेंबरमध्ये अवकाशातही खगोलीय घटनांनी जणू दिवाळीच साजरी होणार आहे. या महिन्यात घडणाऱ्या खगोलीय घटनांत गुरू पृथ्वीजवळ येत असून, तेजस्वी दिसणार आहे. त्याचप्रमाणे पहाटे शुक्र अधिक तेजस्वी दिसेल. चंद्राची शुक्र, शनी आणि बुध ग्रहांशी युती होणार आहे. दोन उल्कावर्षाव आणि धूमकेतू दिसणार आहेत. या सुवर्ण संधीचा फायदा खगोल अभ्यासक, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

           

सम्बन्धित सामग्री