Saturday, October 05, 2024 03:04:09 PM

ऑक्टोबरमध्ये विक्रमी जीएसटी वसुली

ऑक्टोबरमध्ये विक्रमी जीएसटी वसुली

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या काळामुळे १.७२ लाख कोटी रुपयांची विक्रमी जीएसटी वसुली झाली आहे. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर दुसऱ्यांदा एवढी विक्रमी वसुली झालाचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत जीएसटी वसुलीमध्ये तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात १,७२,०३३ कोटी रुपये जीएसटीपोटी वसूल करण्यात आले. यामध्ये ३०,०६२ कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी, ३८१७१ कोटी रुपयांचा राज्य जीएसटी आणि आंतरराज्यीय वाहतुकीवर आकारला जाणारा ९१,३१५ कोटी रुपयांचा आयजीएसटी तसेच १२४५६ कोटी रुपयाच्या उपकराचा समावेश आहे.

           

सम्बन्धित सामग्री