Saturday, October 05, 2024 03:42:30 PM

इस्रालयमधून २१२ भारतीय मायदेशी परतले

इस्रालयमधून २१२ भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रालयमधून शुक्रवारी २१२ भारतीय मायदेशी परतले. भारत सरकारने गुरुवारपासून ऑपरेशन अजय सुरू केले आहे. भारताचे एक विमान गुरुवारी तेल अविव येथे पोहोचले. या विमानातून २१२ भारतीय शुक्रवारी मायदेशी परतले.

इस्रायलमध्ये अठरा हजार आणि पॅलेस्टाईनमध्ये सतरा भारतीय आहेत. यापैकी जे मायदेशी परतू इच्छितात त्यांना आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना तेल अविव आणि रामल्ला येथील भारतीय दूतावासात नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

भारत सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. आवश्यकता भासल्यास या ऑपरेशनमध्ये सहभागी होण्यासाठी हवाई दल आणि नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धन्यवाद भारत सरकार

सुरक्षित मायदेशी परतलेल्या भारतीयांनी दिल्लीत येताच केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले. इस्रायलमध्ये आम्ही सुरक्षित होतो. पण हल्ले सुरू झाले आणि सगळे वातावरण बदलले. आयुष्यातला निवांतपणा अचानक गायब झाला. सायरन वाजला की इमारतीच्या आवारातील सुरक्षित ठिकाणी जायचे आणि रॉकेट हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करायचे अशी धावपळ सुरू झाली. संघर्ष सुरू असल्यामुळे झोप उडाली. भवितव्याची चिंता वाटू लागली. पण मायदेशी परतल्यामुळे सुरक्षित आणि निर्धास्त वाटत आहे, असे इस्रायलमधून दिल्लीत आलेल्या भारतीयांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री