Saturday, October 05, 2024 03:05:29 PM

विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून सुरुवात

विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून सुरुवात

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा एकदिवशीय विश्वचषकाला गुरुवारपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार असून पुढील ४५ दिवस क्रिडाप्रेमींना सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

त्यामुळे पहिला सामना जिंकून कोणता संघ वर्ल्डकपचा श्रीगणेशा करणार याकडेच क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून असेल. आयसीसी एकदिवशीय विश्वचषकामधील सर्व सामने हे एकूण भारतातील १० शहरांमधील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.

वर्ल्डकपमधील सामन्यांचं भारतीय संघाचं वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, ८ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, ११ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, १४ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे, १९ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा, २२ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ, २९ ऑक्टोबर.

भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई, २ नोव्हेंबर.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, ५ नोव्हेंबर.

भारत विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरु, १२ नोव्हेंबर.

वर्ल्डकपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.


सम्बन्धित सामग्री