Sunday, July 07, 2024 12:05:34 AM

शिखर धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट

शिखर धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवनबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट झाला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस संकुलातील कौटुंबिक न्यायालयाने शिखर धवनच्या घटस्फोटाला मजुरी दिली आहे. शिखर धवनच्या पत्नीने धवनला याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक वेदना दिल्याचेही न्यायालयाने मान्य केले.

कौटुंबिक न्यालयाचे न्यायाधीश हरीश कुमार यांनी घटस्पोटाच्या याचिकेत धवनने पत्नीवर केलेले सर्व आरोप मान्य केले. कौटुंबिक न्यालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, धवनच्या पत्नीने एकतर वरील आरोपाला विरोध केला नाही किंवा स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली.

धवनने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे की, त्याच्या पत्नीने त्याला मानसिक क्रौर्याचा बळी बनवले आहे. धवन दाम्पत्याच्या मुलाच्या कायमस्वरूपी ताब्यात घेण्याबाबत कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने धवनला त्याच्या मुलाला वाजवी कालावधीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये भेटण्याचा आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधण्याचा अधिकार दिला.

न्यायालयाने धवनची पत्नी आयेशा हिला शैक्षणिक दिनदर्शिकेदरम्यान शाळेच्या कालावधीत सुट्ट्यांच्या अर्ध्या कालावधीत धवन आणि त्याच्या कुटुंबियांसोबत रात्रीचा मुक्काम करण्यासह मुलाला भेटीसाठी भारतात आणण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्ता शिखर धवन हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्याला एक नागरिक आणि जबाबदार पिता म्हणूनही अधिकार आहेत. याशिवाय मुलाला त्याच्या वडिलांच्या आणि कुटुंबाच्या सहवासात राहण्याचा हक्क देखील कोर्टाने लक्षात घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री