Tuesday, July 09, 2024 02:01:58 AM

भारताला आशियाई स्पर्धेत दोन सिल्वर मेडल

भारताला आशियाई स्पर्धेत दोन सिल्वर मेडल

चीनमध्ये सुरू झालेल्या एशियन गेम्स २०२३ म्हणजे आशियाई स्पर्धेत भारताने सकाळी सकाळीच बोहणी केली आहे. भारताने या स्पर्धेत दोन सिल्व्हर पदकं जिंकले आहेत. भारताने या स्पर्धेत पहिलं पदक निशानेबाजीत जिंकलं आहे. तर दुसरं पदक मेंस डबल्स लाइटवेट स्कलमध्ये मिळवलं आहे. ही दोन्ही पदके जिंकून भारताने पदक तालिकेत आपलं नाव समाविष्ट केलं आहे. आशियाई स्पर्धा सुरू होताच भारताने दोन पदके जिंकल्याने या स्पर्धेत भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता बळावली आहे.

भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी या तिन्ही महिला स्पर्धकांनी १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये रजत पदक जिंकलं आहे. तिघांनी मिळून १८८६ अंक मिळवले आहेत. यात रमिताने ६३१.९ पॉइंट मिळवले. मेहुलीने ६३०.८ तर आशीने ६२३.३ पॉइंट मिळवले आहेत. त्यामुळे भारताला हे पदक जिंकता आलेलं आहे.

निशानेबाजीत भारताने सिल्व्हर पदक जिंकल्याने भारताच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पदक मिळाल्याचं सेलिब्रेशन सुरू असतानाच त्यात आणखी एका आनंदाची भर पडली. भारताने डबल्स स्कलमध्ये आणखी एक पदक मिळाल्याने भारताचा आनंद गगनात मावेनासा झाला. यात पुरुषांच्या लाइटवेट कॅटेगिरीत भारताच्या अर्जुन सिंग आणि जट सिंग यांनी ६:२८:१८ ची वेळ काढत रजत पदक जिंकलं.


सम्बन्धित सामग्री