Saturday, July 06, 2024 11:43:39 PM

पंतप्रधान मोदी नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान मोदी नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २४ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही पहिली वेळ आहे जेव्हा एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सध्याची सर्वात वेगवान लांब पल्ल्याची गाडी आहे. सध्या भारतात २५ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. रविवारी यात आणखी नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची भर पडणार आहे.

रविवारपासून सुरू होणाऱ्या ९ वंदे भारत रेल्वे गाड्यांमुळे, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात अशा अकरा राज्यांतील दळणवळणाला चालना मिळणार आहे.

रविवारी रवाना होणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे आहेत :

१. उदयपूर – जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
२. तिरुनेलवेली – मदुराई – चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
३. हैदराबाद – बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
४. विजयवाडा – चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
५. पाटणा – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
६. कासरगोड – तिरुअनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
७. पुरी – भुवनेश्वर – राउरकेला वंदे भारत एक्सप्रेस
८. रांची – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
९. जामनगर – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस


सम्बन्धित सामग्री