Tuesday, July 09, 2024 01:14:07 AM

भारताच्या तुलनेत लहान आहे कॅनडाची अर्थव्यवस्था

भारताच्या तुलनेत लहान आहे कॅनडाची अर्थव्यवस्था

भारताला नाराज करणाऱ्या कॅनडाची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत लहान आहे आणि प्रामुख्याने अमेरिकेवर अवलंबून आहे. पण भारत आणि कॅनडा हे दोन्ही देश जी २० चे सदस्य आहेत. जगातील सर्वात मोठ्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांचा समावेश होतो. यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाकडे जगाचे लक्ष आहे.

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पाचव्या तर कॅनडा नवव्या स्थानावर
कॅनडाच्या एकूण निर्यातीपैकी ७५.६ टक्के निर्यात फक्त अमेरिकेत होते
कॅनडा ४.६ टक्के निर्यात चीनमध्ये करतो
कॅनडा १३.६ टक्के निर्यात भारतासह इतर मोठ्या देशांना करतो
भारताने कॅनडाला २०२२-२३ मध्ये ४.१० अब्ज डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या
कॅनडाने भारताला ४.०५ अब्ज डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या
कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान फक्त चार टक्के
कॅनडाचा जवळपास अर्धा भूभाग जंगलाने व्यापला आहे
कॅनडा मोठ्या प्रमाणात लाकूड, कागद, पल्प, मासे यांची निर्यात करतो
कॅनडात आढळणारी प्रमुख खनिजे : हिरे, कोळसा, सोने, चांदी, युरेनियम, सल्फर, टायटेनियम

     

सम्बन्धित सामग्री