Tuesday, September 17, 2024 01:20:26 AM

कोकरनाग चकमक संपली, तीन दहशतवादी ठार

कोकरनाग चकमक संपली तीन दहशतवादी ठार

कोकरनाग, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील कोकरनाग येथील चकमक सात दिवसांनंतर संपली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. उझैर बशीर खान नावाचा लष्कर-ए-तोयबा संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर या चकमकीत ठार झाला.

चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. इतर दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत.

कोकरनाग येथील चकमक सुरू असताना सुरक्षा पथकाचे तीन अधिकारी आणि एक जवान असे चार जण हुतात्मा झाले.

चार जण हुतात्मा

कर्नल मनप्रीत सिंग, सेनापदक विजेते
मेजर आशिष धोनचक, १९ वी राष्ट्रीय रायफल
हुमायून मुझामिल भट, पोलीस उपअधीक्षक, जम्मू आणि काश्मीर
शिपाई प्रदीप पटेल, १९ वी राष्ट्रीय रायफल

कुठे आहे कोकरनाग ?

भारत - पाकिस्तान सीमेवर आहे जम्मू काश्मीर

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आहे कोकरनाग

दहशतवाद्यांविरोधातली मोहीम

कोकरनागमधील घनदाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम

सातव्या दिवशी संपली मोहीम

कोकरनागमध्ये तीन दहशतवादी ठार

सुरक्षा पथकाचे तीन अधिकारी आणि एक जवान हुतात्मा


सम्बन्धित सामग्री