Wednesday, October 02, 2024 11:02:08 AM

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा'

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात कामकाजाचा श्रीगणेशा

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: देशाच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी, नवं संसद भवन सज्ज झालं आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज नव्या संसद भवनातून सुरू होणार आहे. मंगळवारी (१९ सप्टेंबर) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या संसदीय वारशाचे स्मरण करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभाचे नेतृत्व उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत. अंदाजे दीड तास हा सोहळा सुरू राहणार असून त्याची सुरुवात आणि शेवट राष्ट्रगीतानं होणार आहे. त्यानंतर दुपारचं जेवण होईल आणि मग प्रमुख नेते सर्व खासदारांना नवीन संसद भवनात घेऊन जातील.


सम्बन्धित सामग्री