Wednesday, October 02, 2024 10:40:32 AM

पंतप्रधान मोदींनी दिला आठवणींना उजाळा

पंतप्रधान मोदींनी दिला आठवणींना उजाळा

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. हा संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. मंगळवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज सेंट्रल व्हिस्टामधून अर्थात नव्या इमारतीमधून सुरू होईल. याच कारणामुळे सोमवारी संसद भवन आणि या इमारतीत आतापर्यंत झालेले कामकाज या विषयावर चर्चा सुरू आहे. चर्चेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याआधी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज नव्या इमारतीमधून मंगळवारी सुरू होणार असल्याचे जाहीर केले.

इंग्रजांनी पं. नेहरू यांच्या नेतृत्वात हंगामी सरकार स्थापन केले. या सरकारच्या नेतृत्वात संसद भवनात संविधान सभेचे कामकाज सुरू झाले. ही संसद भवनातील संसदीय लोकशाहीची औपचारिक सुरुवात होती. या संसदीय लोकशाहीच्या प्रवासाला ७५ वर्षे झाली. पंतप्रधान मोदी यांनी चर्चेची सुरुवात करताना संसद भवनातील संसदीय लोकशाहीचा ७५ वर्षांचा प्रवास आणि या प्रवासातील चांगल्यावाईट घटनांना उजाळा दिला.

https://www.youtube.com/watch?v=KGiqeiPXSSw


सम्बन्धित सामग्री