Thursday, July 04, 2024 10:41:55 AM

राज्यात वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी

राज्यात वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुंबई, १७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: भगवान विष्णूच्या दशावतारातील एक असलेल्या वराह अवताराचे राज्यभरात रविवारी पूजन करण्यात आले. या निमित्ताने सजवलेल्या वाहनातून वराह मिरवणूक काढण्यात आली.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर, नाशकात, वराह जयंती निमित्ताने महिलांकडून हवन करण्यात आलं.

हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून धर्माच्या रक्षणासाठी आणि मानव कल्याणासाठी पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करणाऱ्यासाठी भगवान वराह यांना पुजले जाते. भाद्रपद शुद्ध द्वितीयेला वराह पूजन केले जाते.

जेव्हा कलाकार म्हणतात…
हॅप्पी वराह जयंती

भाद्रपद शुद्ध द्वितीयेला वराह पूजन केले जाते. या निमित्ताने विविध मान्यवरांनी वराह जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हुड हुड दबंग दबंग, चलाओ ना नैनो से बाण रे, तेरे नैना मार ही डालेंगे अशा ५०० हून अधिक हिट गाणे देणारे गायक शबाब सब्री यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत हे विशेष.


सम्बन्धित सामग्री