Thursday, July 04, 2024 09:10:40 AM

राहुल गांधी युरोप दौऱ्यावर

राहुल गांधी युरोप दौऱ्यावर

नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी जवळजवळ आठवडाभराच्या युरोप दौर्‍यावर रवाना झाले आहेत. ते युरोपच्या संसदेला भेट देणार आहेत, नेदरलँड्स येथील लीडेन विद्यापीठात एक भाषण करणार आहेत. तसेच अनिवासी भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

राहुल गांधी ७ सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनमधील प्रतिष्ठीत वकिलांना भेटणार आहेत. अशीच एक बैठक हेग येथे होणार आहे. तसेच राहुल गांधी ८ सप्टेंबर रोजी पॅरिसमधील विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. ते ९ सप्टेंबर रोजी पॅरिसमध्ये फ्रान्सच्या कामगार संघटनेच्या बैठकीत सहभागी होणार आहेत . त्यानंतर ते नॉर्वेला भेट देणार आहेत. ते १० सप्टेंबर रोजी ओस्लो येथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

दिल्लीत जी २० देशांची परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी आहे. ही परिषद संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबर रोजी राहुल गांधी मायदेशी परतणार आहेत.

जी २० देशांची परिषद

भारतात दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी २० देशांची परिषद होत आहे. या बैठकीला ३० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख, युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, आमंत्रित अतिथी देश आणि १४ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित असतील.


सम्बन्धित सामग्री